MPSC State Service Bharti 2025 | महाराष्ट्र राज्यसेवा राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४

MPSC State Service Bharti 2025: शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणीपत्रांनुसार दिनांक ०८ मे, २०२४ व दिनांक २० फेब्रुवारी, २०२५ रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२४ चा निकाल दिनांक १२ मार्च, २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर निकालानुसार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४, दिनांक २६ एप्रिल, २०२५ ते दिनांक २८ एप्रिल, २०२५ या कालावधीत अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.
MPSC State Service Bharti 2025: महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा निकाल दिनांक 12 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निकालानुसार मुख्य परीक्षेसाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्यासाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ही खाली दिलेल्या कालावधीत घेण्यात येणार आहे. जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
वरील माहितीनुसार जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्यासाठी राज्यसेवा आयोगा मार्फत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कोणकोणत्या परीक्षा केंद्रांवर ती परीक्षा होणार आहे याची माहिती देखील खाली दिली आहे. त्यानुसार तुम्ही हा लेख सविस्तर वाचावा. जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल
पदांचा तपशील:
पदाचे नाव:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | उप जिल्हाधिकारी गट- अ | 07 |
| 02 | पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, गट- अ | 20 |
| 03 | सहायक राज्य कर आयुक्त गट- अ | 116 |
| 04 | गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट- अ | 52 |
| 05 | सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट- अ | 43 |
| 06 | सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन) गट- अ | 03 |
| 07 | उद्योग उपसंचालक (तांत्रिक) गट- अ | 07 |
| 08 | सहायक कामगार आयुक्त गट- अ | 02 |
| 09 | सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार, गट- अ | 01 |
| 10 | मुख्याधिकारी/ सहायक आयुक्त गट- अ | 26 |
| 11 | मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट- ब | 19 |
| 12 | सहायक गट विकास अधिकारी, गट- ब | 25 |
| 13 | सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट- ब | 01 |
| 14 | उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट- ब | 05 |
| 15 | कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट- ब | 07 |
| 16 | सरकारी कामगार अधिकारी, गट- ब | 04 |
| 17 | सहायक प्रकल्प अधिकारी/ सांखिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी/ गृह्प्रमुख प्रबंधक, गट- ब | 04 |
| 18 | उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट- ब | 07 |
| 19 | सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट- ब | 52 |
| 20 | निरीक्षण अधिकारी (पुरवठा) गट- ब | 76 |
एकूण पदे: 477
शैक्षणिक पात्रता:
- सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट- अ: या उमेदवारांसाठी 55% गुणांसह B.Com किंवाCA/ ICWA किंवा MBA
- उद्योग उपसंचालक (तांत्रिक) गट अ: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- उद्योग अधिकारी तांत्रिक– सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- राहिलेली इतर पदे– पदवीधर
हे देखील पाहा:
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे पद भरती सुरु
वयोमर्यादा:
- निरीक्षण अधिकारी व परिमंडळ अधिकारी- 25 जानेवारी 2024 रोजी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे
- राहिलेली इतर पदे- 01 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी:
- खुल्या प्रवर्गासाठी 544 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे
- मागासवर्गीय आ.दु.घ/ अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 344 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे
परीक्षा केंद्र:
अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे
महत्वपूर्ण तारखा:
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
03 एप्रिल 2025
परीक्षेची तारीख:
26 ते 28 एप्रिल 2025
महत्वपूर्ण लिंक्स:
आम्ही MPSC State Service Bharti 2025 लेखामध्ये तुम्हाला या भरतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मित्रानो अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा.
महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेछ्या……
MPSC State Service Bharti 2025 | महाराष्ट्र राज्यसेवा राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
MPSC State Service Bharti 2025 | महाराष्ट्र राज्यसेवा राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. तरीही आपण आपला अर्ज विहित तारखेच्या आत ब भरावा.
MPSC State Service Bharti 2025: महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी परीक्षा कोणत्या केंद्रावर होणार आहे ?
सदर निकालानुसार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४, दिनांक २६ एप्रिल, २०२५ ते दिनांक २८ एप्रिल, २०२५ या कालावधीत अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.



