GGMCJJH Bharti 2025 सर जे. जे समूह रुग्णालय येथे भरती, 7 वी पास उमेदवारांना संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GGMCJJH Bharti 2025 सर जे. जे समूह रुग्णालय येथे भरती, 7 वी पास उमेदवारांना संधी, त्वरित अर्ज करा

GGMCJJH Bharti 2025

GGMCJJH Bharti 2025: सर जे. जे. रुग्णालय मुंबईयेथे विविध पदांसाठी भारती होत आहे. जे. जे. रुग्णालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती मुखाखतीद्वारे होणर असून तुम्हाला या बद्दल सर्व सविस्तर माहिती पहावयास मिळणार आहे.

GGMCJJH मुंबई अंतर्गत भरती प्रसिद्ध झाली आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर आणी शिपाई पद्साठी हि भरती होत आहे. मुलाखतीची तारीख 29 एप्रिल ही आहे. या भरती बद्दल अधिक माहिती आम्ही खाली दिली आहे. तसेच सविस्तर माहिती साठी जाहिरात पहावी.

GGMCJJH Bharti 2025

भरतीचा सविस्तर तपशील:

भरतीचा आढावा:

भरती प्रकार:

कंत्राटी बेसिस

भरती विभाग:

जे. जे. रुग्णालय, मुंबई

पदाचे नाव व पद संख्या:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1डेटा एन्ट्री ऑपरेटर18 जागा
2शिपाई03 जागा
 एकूण 21 जागा

शैक्षणिक पात्रता:

डेटा एन्ट्री ऑपरेटर-

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. MSCIT
  3. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

शिपाई-

7 वी ते 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे,

नोकरी ठिकाण:

मुंबई येथे नोकरी करण्याची संधी आहे.

वयोमर्यादा:

30 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे. जे. समूह रुग्णालय मुंबई- 400008

जाहिरात pdf क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा

महत्वपूर्ण सूचना:

  • वरील पद्संखेमध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात.
  • हि भरती कंत्राटी स्वरुपाची आहे.
  • MSCIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मुलाखतीच्या अगोदर अर्धा तास ठरलेल्या ठिकाणी उपस्थित राहने बंधनकारक आहे.
  • उमेदवाराने येताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.
  • उमेदवाराने रुजू झाल्यानंतर सर्व नियम पाळणे आवश्यक आहे.
  • निवडकर्त्यांचा निर्णय अंतिम राहील.

निवड प्रक्रिया:

सदर भरतीसाठी उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

वेतन शुल्क:

डेटा एन्ट्री ऑपरेटर- 10,000 रुपये

शिपाई- 6,000 रुपये

आवश्यक कागदपत्रे:

  1. जन्माचा दाखला
  2. शैक्षणिक कागदपत्रे
  3. पासपोर्ट साईझ 2 फोटो
  4. कोर्स प्रमाणपत्रे
  5.  अनुभव प्रमाणपत्रे

सर्वसाधारण अटी :

१) वरील नमुदप्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल होणारे आहेत.

२) भरती निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असून ती राज्यशासनाकडील पदे नसल्याने कायमस्वरुपी समावेशन होणार नाही.

३) एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

४) कामाचा अनुभव ग्राहय धरला जाईल.

५) जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा न भरणे/प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार हे संस्थेने राखून ठेवले आहेत.

६) उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

७) उमेदवाराने मुलाखतीस येतांना सर्व मुळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीसह महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई येथे मुलाखतीस उपस्थित रहावे.

८) सदर भरती प्रक्रियेअंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबींवर मान संस्थाप्रमुख यांनी घेतलेले निर्णय अंतीम असतील,

विशेष सुचना

१) निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती तथा आदेश स्विकारण्यापासून १२० दिवसांकरीता देण्यात येतील.

२) सदर नियुक्त्या काम समाधानकारक असल्यास १ दिवसाचा खंड देवून जास्तीत-जास्त ३६४ दिवसांपर्यंत चालू ठेवण्यात येतील.

३) उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

४) प्रशासकिय किंवा अन्य कारणास्तव निवड (भरती) प्रक्रिया कोणात्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचा अधिकार अधिष्ठाता ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई यांचेकडे राखुन ठेवण्यात आलेला आहे.

५) निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ कंत्राटी (करार) नियुक्त्या देण्यात येत असल्याने त्या कधीही व केव्हाही कमी करण्यात येतील त्यावर त्यांना कोणताही कायम स्वरुपाचा हक्क सांगता येणार नाही.

६) वर नमुद केलेल्याप्रमाणे सर्वांना वेतन निश्चित स्वरुपातील आहे (कंत्राटी बेतन).

७) कामगारांना तीन पाळ्यांमध्ये डबुटी राहील.

कामाची वेळ सकाळी ८:०० ते संध्याकाळी ५:००

दुपारी २:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत आणि रात्री १०:०० ते सकाळी ८:०० पर्यंत.

८) अर्ज विहीत नमुन्यात सादर करावा.

अ) ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदाचे नांव ब) पुर्ण पत्ता, दुरध्वनी /भ्रमणध्वनी ई-मेल आयडी ड) जन्म दिनांक (शालांत परीक्षा प्रमाणपत्रावरील) इ) शैक्षणिक अर्हता/कोर्स, कोठून उत्तीर्ण केलेत त्या संस्थेचे अथवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण, टक्के) कामाचा अनुभव पदनिहाय. वर्ष/महिने मोबदला किती मिळत होता. इ. आदेशानुसार माहिती अर्जात नमुद करावी. अर्जासोबत पारपत्र आकाराचे दोन फोटो, काम केलेल्या बददल अनुभव प्रमाणपत्राच्या प्रती (सांक्षाकीत केलेल्या) यासह भरलेला अर्ज थेट मुलाखतीकरीता मंगळवार दिनांक २९ एप्रिल, २०२५ रोजी उमेदवाराने स्वतः महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर ज.जी.समुह रुग्णालये मुंबई ४००००८ येथे उपस्थित रहावे.

मुलाखतीची वेळ :- सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत राहील.

लक्ष्यात ठेवा:

आजच्या काळात भरती संदर्भात अनेक खोट्या बातम्या पसरत आहेत. त्यामुळे कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर सदर भरतीच्या संबंधित संकेत स्थळावरती जाऊन जाहिरात पहावी.

तसेच अशा खोट्या बातम्यांपासून वाचण्यासाठी आमचा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. ज्यावरती आम्ही वेळोवेळी भरती बद्दल सर्व अपडेट्स देत राहतो. विद्यार्थी मित्रानो सर्वात प्रथम आपण अधिकृत जाहिरात वाचावी. अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आमचा whatsapp आणि teligram ग्रुप जॉईन करा व अपडेट मिळवा आपल्या मोबाईलवर.

GGMCJJH Bharti 2025 सर जे. जे समूह रुग्णालय येथे किती जागांसाठी भरती होत आहे?

GGMCJJH Bharti 2025 सर जे. जे समूह रुग्णालय येथे 21 जागांसाठी भरती होत आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदासाठीच्या मुलखात दिनांक 29 एप्रिल 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment