ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF 2026 | Gramsevak Bharti Syllabus 2026 Pdf In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF २ | Gramsevak Bharti Syllabus 2026 Pdf In Marath   

ग्रामीण भागाच्या विकासाचा खरा कणा म्हणजे ग्रामसेवक पद. गावपातळीवर शासनाच्या योजना योग्य पद्धतीने राबवणे, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाय करणे आणि ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला बळकटी देणे ही जबाबदारी ग्रामसेवकावर असते. त्यामुळेच ग्रामसेवक भरती ही केवळ नोकरी नसून समाजसेवेची संधी मानली जाते.ग्रामसेवक हे पद सुरुवातीचे 3 वर्षे कंत्राटी स्वरूपाचे असते. तुमचे 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भरतीच्या नियमानुसार तुम्हाला या पदामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती केले जाते.
दरवर्षी हजारो उमेदवार ग्रामसेवक पदासाठी अर्ज, ग्रामसेवक भरती 2025, ग्रामसेवक अभ्यासक्रम, आणि ग्रामसेवक परीक्षा तयारी कशी करावी यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. योग्य मार्गदर्शन, अधिकृत माहिती आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास ग्रामसेवक होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते.

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF 2026 | Gramsevak Bharti Syllabus 2026 Pdf In Marathi


या लेखामध्ये आपण ग्रामसेवक भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, तयारीचे टिप्स आणि अधिकृत अपडेट्स सोप्या व स्पष्ट भाषेत पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठेही गोंधळ न होता योग्य दिशा मिळेल.

जर तुमचे स्वप्न ग्रामसेवक हे पद मिळवणे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. ग्रामसेवक हे पद तुम्ही कसे मिळवू शकता याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ग्रामसेवकाचे काय काम असते, त्यांच्यासाठी कोणती परीक्षा असते, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी, अभ्यासक्रम अशी सर्वच माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

ग्रामसेवकाची स्थापना व काम खालीलप्रमाणे

  • ग्रामसेवक पदाची स्थापना ग्रामपातळीवर शासनाचा थेट प्रतिनिधी म्हणून करण्यात आली.
  • स्वातंत्र्यानंतर शासकीय योजना गावांपर्यंत वेळेत, योग्य आणि प्रामाणिकपणे पोहोचाव्यात, तसेच ग्रामपंचायत प्रशासन अधिक सक्षम व्हावे—या उद्देशाने हे पद अस्तित्वात आले.
  • ग्रामसेवकाची स्थापना ही फक्त पदनिर्मिती नसून “योजना + प्रशासन + गावकरी” यांना एकत्र जोडणारी प्रणाली उभारण्याचा भाग होती.

ग्रामसेवकाची प्रमुख कामे

  • ग्रामपंचायतीचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज पाहणे
  • शासकीय योजना गावात प्रभावीपणे राबवणे
  • लाभार्थ्यांची नोंद, पडताळणी व प्रस्ताव तयार करणे
  • ग्रामसभा व पंचायत बैठकींची तयारी व नोंद ठेवणे
  • जन्म–मृत्यू, कर, दाखले यांचे रेकॉर्ड व्यवस्थापन
  • ग्रामस्थांच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयांपर्यंत पोहोचवणे
  • गावातील विकासकामांवर देखरेख ठेवणे

शैक्षणिक पात्रता:

ग्रामसेवक या पदासाठी तुम्हाला 60% गुणांसह १२ वी पास असणे आवश्यक आहे. उमेदवाराची MSCIT झालेली असणे आवश्यक आहे. रुजू झाल्यानंतर 2 वर्षांच्या आत MSCIT सर्टीफिकेट सादर करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:

ग्रामसेवक या पदाला खालीलप्रमाणे प्रवर्गानुसार वयोमर्यादा देण्यात आली आहे.

  • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
  • दिव्यांग उमेदवार: 18 ते 45 वर्षे
  • प्रकल्पग्रस्त: 18 ते 45 वर्षे
  • भूकंपग्रस्त: 18 ते 45 वर्षे

परीक्षा पद्धती:

विषय प्रश्न गुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
बुद्धिमत्ता चाचणी1530
तांत्रिक विषय4080
एकूण 100 200

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF 2026 | Gramsevak Bharti Syllabus 2026 Pdf In Marathi

अभ्यासक्रम:

ग्रामसेवक या पदासाठी कोणकोणत्या विषयासाठी किती मार्क आहेत हे आपण वरती दिले आहे. आता आपण सविस्तरपणे प्रत्येक विषयामध्ये कोणकोणते टोपीक घावेत हे देणार आहोत.

मराठी:

  • वाक्यरचना
  • वाक्यप्रचार
  • शब्दलेखन
  • शुद्धलेखन
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • विरामचिन्हे
  • वाक्यप्रचार व म्हणी
  • सामासिक शब्द
  • भाषांतर साधे
  • गद्य व पद्य आकलन

गणित:

  • बेरीज
  • वजाबाकी
  • गुणाकार
  • भागाकार
  • नफा- तोटा
  • साधे व्याज, चक्रवाढ व्याज
  • वेळ व काम
  • वेळ, अंतर व वेग
  • घनफळ, क्षेत्रफळ
  • प्रमाण व अनुपात
  • साधारण गणित
  • टक्केवारी

इंग्रजी भाषा:

  • Parts of speech
  • Tenses
  • Vocabulary
  • Active- passive voice
  • Articles, Prepositions
  • Direct- indirect speech
  • Simple Comprehension
  • Sentence correction

बुद्धिमत्ता चाचणी:

  • चित्रात्मक तर्क
  • शब्द्संगती
  • अंकगणितीय तर्क
  • समस्या सोडविणे
  • क्रम/ पद निवड
  • दिशा निर्णयन
  • अल्प माहितीवरून निष्कर्ष

सामान्य ज्ञान:

  • भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास
  • भारतीय राज्यव्यवस्था
  • पंचायती राज व्यवस्था
  • ग्रामपंचायत व कार्यपद्धती:
  • शेतकरी चळवळी
  • सहकारी चळवळ
  • महाराष्ट्राचा भूगोल: नद्या, हवामान, शेती, उद्योग
  • भारताचा भूगोल: नद्या, पर्वत, खनिजे, शेती
  • चालू घडामोडी
  • महिला, बाल विकास योजना
  • ग्रामीण विकास
  • कृषी योजना

ग्रामीण विकास व ग्रामपंचायत:

  • ग्रामसेवकाची कामे
  • पंचायतराज संस्था
  • ग्रामसभेचे प्रकार व कार्ये
  • पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्ये
  • ग्रामपंचायत रचना, कर्तव्ये व अधिकार
  • महसूल, जमीन मोजणी व फेरफार
  • कृषी विकास योजना
  • सहकार संस्था
  • जलसंधारण, जलव्यवस्थापन
  • सामाजिक व शैक्षणिक योजना
  • विविध प्रमाणपत्रे व त्यांची प्रक्रिया (निवास, जात व उत्पन)

निवड प्रक्रिया:

संगणक आधारित परीक्षा:

ग्रामसेवक पदासाठी सर्वप्रथम तुम्हाला संगणक आधारित परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रियेस पत्र ठरता.

कागदपत्रे पडताळणी:

वरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी होते. यामध्ये उमेदवाराचे सर्व मूळ कागदपत्रे तपासली जातात. उमेदवाराची सर्व कागदपत्रे योग्य असल्यास उमेदवार पुढील प्रक्रियेस पात्र राहतो.

मेरीट लिस्ट:

वरील दोन्ही प्रक्रियांमध्ये उतीर्ण झाल्यानंतर फायनल मेरीट लिस्ट लागते. ज्या उमेदवारांचे या लिस्टमध्ये नाव येईल तो उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरतो.

वेतन श्रेणी:

ग्रामसेवक पदासाठी सुरुवातीचे 3 वर्षे वेतन 16000 रुपये असते. 3 वर्षानंतर नियमित झाल्यानंतर 25500 रुपये ते 81100 रुपयांपर्यंत वेतनश्रेणी जाते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • 10 वी, 12 वी, पदवी प्रमाणपत्र (पदवी झाली असेल तर)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पनाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • जात वैध्यता प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर सर्टीफिकेट
  • डोमेसाईल सर्टीफीकेट

अपंग प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र, माजी सैनिक या चार प्रमाणपत्र मधील तुम्हाला जे लागू होते ते लागेल.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा !

इतर पदभरतीविषयी माहितीसाठी क्लिक करा !

भरतीमध्ये व्हेरीफिकेशन साठी लागणारे कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. पेन कार्ड
  3. मतदार ओळखपत्र
  4. 10 वी ची मूळ गुणपत्रिका
  5. 12 वी ची मूळ गुणपत्रिका
  6. पदवीचे प्रमाणपत्र
  7. जन्म प्रमाणपत्र
  8. शाळा सोडल्याचा दाखला
  9. जात प्रमाणपत्र
  10. जात वैधता प्रमाणपत्र
  11. नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  12. EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  13. रहिवासी प्रमाणपत्र
  14. अपंगत्व प्रमाणपत्र
  15. क्रीडा प्रमाणपत्र
  16. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  17. राशन कार्ड
  18. चरित्र प्रमाणपत्र
  19. चरित्र प्रमाणपत्र
  20. वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र
  21. शपथपत्र
  22. अर्ज प्रिंट
  23. दस्तऐवज पडताळणी कॉल लेटर

भरतीसाठी अर्ज कसा करावा:

  • सर्वप्रथम भरतीची जाहिरात वाचून ती योग्य असल्याची खात्री करा.
  • भरतीचे निकष, पात्रता तुमच्यासाठी योग्य आहेत का याची खात्री करा.
  • अधिकृत जाहिरातीमध्ये अर्ज लिंक दिलेली असेल त्यावरती क्लिक करा.
  • तुमचे रजिस्ट्रेशन करा मग लॉग इन करून तुमचा फॉर्म भरा व आवश्यक सर्व कागदपत्रे जोडा.
  • एकदा सर्व माहिती अयोग्य आहे का याची खात्री करा.
  • शेवटी फॉर्म सबमिट करून ऑनलाईन पेमेंट करा.
  • अर्जाची प्रिंट व पेमेंट केल्याची पावती डाऊनलोड करा.
Agniveer Syllabus 2025: Army, Navy, Airforce संपूर्ण अभ्यासक्रम PDF सहDownload Now
SSC GD 2025 Syllabus PDF | एसएससी जीडी अभ्यासक्रम मराठीत – विषयवार माहिती”Download Now
SSC MTS Syllabus 2025 in Marathi | एसएससी एमटीएस अभ्यासक्रम मराठीतDownload Now
RRB Group D Syllabus 2025 In Marathi | रेल्वे ग्रुप D अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्नDownload Now

अभ्यासासाठी प्रेरणा:

ग्रामसेवक पद ही केवळ एक सरकारी नोकरी नसून ग्रामीण समाजाच्या विकासासाठी काम करण्याची मोठी संधी आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासनात सक्रिय सहभाग, शासकीय योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गावाच्या प्रगतीस हातभार लावणे हे ग्रामसेवकाचे मुख्य कार्य आहे. योग्य अभ्यासक्रम, सातत्यपूर्ण तयारी आणि अधिकृत माहितीच्या आधारे ग्रामसेवक भरती 2025 मध्ये यश मिळवणे नक्कीच शक्य आहे. जर तुम्ही स्थिर नोकरीसोबत समाजसेवा करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ग्रामसेवक पद तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतोग्रामसेवक हे पद मिळविणे जास्त कठीण नाही. तुम्ही चांगला अभ्यास करून लवकरच हे पद मिळवू शकता. ग्रामसेवक हे पद प्रत्येक गावाला गरजेचे असते. त्यामुळे याच्या दरवर्षी अनेक जागा निघतात. त्यामुळे चांगला अभ्यास करून या पदासाठी तुमची वर्णी लागू शकते.आपण जर एखाद्या परीक्षेच्या तयारी करत असू किंवा करणार आहोत, तर त्यासाठी योग्य दिशा आणि नियोजन आवश्यक असते. जर ह्या दोन गोष्टी जर आपण परीक्षांर्थी म्हणून समजून घेतले,तर कोणतेही परीक्षा असुद्या यश नक्कीच मिळेल. कारण सर्वात महत्वाच असते ते म्हणजे सात्यत असते. अभ्यास सुरु करण्याअगोदर सर्वात प्रथम अभ्यासक्रम बघणे गरजेच आहे. कोणत्या विषयाला किती महत्व आहे? प्रश्नाची पातळी काय आहे? परीक्षासाठी काय महत्वाच आहे? मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे महत्वाचे आहे. यावरून अंदाज येतो कि परीक्षेची डिमांड काय आहे हे जर आपण समजून घेतल तर नक्कीच आपल्याला लवकर यश मिळेल. अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आजच आपले whatasaap व teligram ग्रुप नक्कीच जॉईन करा! मिळवा रोजच्या रोज अपडेट आपल्या मोबाईलं वरती तेही अगदी मोफत! आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल किंवा फादेशीर ठरत असेल तर आपला अभिप्राय नक्कीCOMMENT च्या माध्यमाने कळवा ! कारण आपला अभिप्राय आम्हाला प्रेरणा देत असतो.

ग्रामसेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

ग्रामसेवक पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

ग्रामसेवक भरती परीक्षा ऑनलाईन असते का?

होय, बहुतांश वेळा ग्रामसेवक भरती परीक्षा ऑनलाईन (CBT) पद्धतीने घेतली जाते.

ग्रामसेवक परीक्षेसाठी मराठी माध्यम उपलब्ध आहे का?

होय, उमेदवार मराठी माध्यमातून परीक्षा देऊ शकतो.

ग्रामसेवक नोकरी कायमस्वरूपी असते का?

होय, ग्रामसेवक ही शासकीय आणि कायमस्वरूपी नोकरी आहे.

ग्रामसेवक भरतीची अधिकृत माहिती कुठे मिळेल?

ग्रामसेवक भरतीची अधिकृत जाहिरात व अपडेट्स शासनाच्या संकेतस्थळावर आणि विश्वासार्ह नोकरीविषयक वेबसाइट्सवर उपलब्ध असतात.

ग्रामसेवक परीक्षेची तयारी कशी करावी?

अभ्यासक्रम समजून घेणे, मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवणे, चालू घडामोडी वाचणे आणि नियमित सराव करणे ही तयारीची योग्य पद्धत आहे.

ग्रामसेवक पदाची स्थापना का करण्यात आली?

ग्रामीण भागातील प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी ग्रामसेवक पदाची स्थापना करण्यात आली. गावातील नागरिक आणि शासन यांच्यात थेट संपर्क राहावा, तसेच शासकीय योजना योग्य पद्धतीने गावपातळीवर राबवता याव्यात, हा या पदामागील मुख्य उद्देश होता.

ग्रामसेवक पदाची स्थापना कोणत्या स्तरावर कार्यरत आहे?

ग्रामसेवक पद हे ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असते. ग्रामपंचायतीचे दैनंदिन प्रशासन सुरळीत चालावे यासाठी ग्रामसेवक हा प्रशासकीय कणा म्हणून काम करतो.

ग्रामसेवकाचे मुख्य काम काय असते?

ग्रामसेवकाचे मुख्य काम म्हणजे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करणे, ग्रामसभेच्या बैठका आयोजित करणे, ठरावांची अंमलबजावणी करणे आणि शासनाकडून येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे.

ग्रामसेवक शासन आणि ग्रामपंचायत यांच्यात दुवा कसा बनतो?

ग्रामसेवक शासनाचे आदेश, नियम व योजना ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवतो आणि गावातील समस्या, मागण्या व अहवाल शासनापर्यंत पाठवतो. त्यामुळे ग्रामसेवक हा प्रशासनातील महत्त्वाचा दुवा ठरतो.

ग्रामसेवकाचे आर्थिक कामकाजाशी काय संबंध असतो?

ग्रामपंचायतीचा अंदाजपत्रक, खर्च नोंदी, कर वसुलीची माहिती आणि विविध निधींचा योग्य वापर यामध्ये ग्रामसेवक सहाय्यक भूमिका बजावतो.

ग्रामसेवक ग्रामसभेच्या कामात कशी भूमिका बजावतो?

ग्रामसभेच्या बैठकीची पूर्वतयारी, अजेंडा तयार करणे, उपस्थिती नोंदवणे, ठरावांची नोंद ठेवणे आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे ही ग्रामसेवकाची महत्त्वाची जबाबदारी असते.

ग्रामसेवकाचा गावाच्या विकासात कसा सहभाग असतो?

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल योजना, रोजगार योजना यांसारख्या विकासकामांच्या अंमलबजावणीत ग्रामसेवक सक्रिय सहभाग घेतो आणि कामाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करतो

ग्रामसेवक पद ग्रामीण प्रशासनासाठी का आवश्यक आहे?

ग्रामसेवक नसल्यास ग्रामपंचायतीचे कामकाज विस्कळीत होऊ शकते. प्रशासनात शिस्त, सातत्य आणि पारदर्शकता राखण्यासाठी ग्रामसेवक पद अत्यंत आवश्यक आहे.

ग्रामसेवक पद समाजसेवेचे प्रतीक का मानले जाते?

ग्रामसेवक थेट लोकांच्या संपर्कात काम करतो. गावाच्या विकासासाठी केलेले कार्य थेट नागरिकांच्या जीवनावर परिणाम करत असल्यामुळे हे पद समाजसेवेचे प्रतीक मानले जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment