SSC CHSL परीक्षा माहिती 2026 | पात्रता, अभ्यासक्रम, तयारी मार्गदर्शन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

  SSC CHSL परीक्षा माहिती 2026 | पात्रता, अभ्यासक्रम, तयारी मार्गदर्शन           

 SSC CHSL (Combined Higher Secondary Level)
SSC CHSL (Combined Higher Secondary Level)

 सरकारी नोकरी हे केवळ एक पद नसून, ती लाखो तरुणांच्या मेहनतीची, संयमाची आणि स्वप्नांची ओळख असते. अशाच स्वप्नांना दिशा देणारी एक महत्त्वाची परीक्षा म्हणजे SSC CHSL (Combined Higher Secondary Level) परीक्षा.
१२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये स्थिर, सन्मानजनक आणि सुरक्षित करिअरची दारे उघडणारी ही परीक्षा अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नविन वळण देत असते. SSC CHSL ही परीक्षा केवळ ज्ञानाची नव्हे, तर वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असते. कमी शैक्षणिक पात्रतेतून मोठ्या संधी उपलब्ध करून देणारी ही भरती परीक्षा ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करते. योग्य अभ्यासक्रम, अचूक रणनीती आणि नियमित सराव केल्यास SSC CHSL मधील यश हे अशक्य नाही, तर पूर्णपणे साध्य आहे.कर्मचारी निवड आयोग (SSC) ही एक केंद्र सरकारची संस्था आहे जी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची निवड करते. CHSL ही परीक्षा SSC च्या अंतर्गतच येते जी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असते. त्यामध्ये काही विशिष्ट पदे भरली जातात.

या लेखामध्ये आपण SSC CHSL बद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच या भरती मार्फत कोणकोणती पदे भरली जातात तसेच वेतनमान किती असते, या पदांसाठी अभ्यासक्रम कोणता असतो हे पाहणार आहोत.

ssc (Staff Selection Commission) थोडक्यात व महत्वपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:

SSC चा फुल फॉर्म स्टाफ सिलेक्शन कमिशन असा आहे. हि एक केंद्रसरकारची महत्वाची भरती संस्था आहे. जसे कि विविध पदाची भरती प्रक्रिया राबवणे. SSC ची स्थापना १९७५ साली करण्यात आली आहे. ssc चे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग व कार्यालयांमध्ये ग्रुप ‘B’ आणि ग्रुप ‘C’ पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करणे हे SSC चे मुख्य काम आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक, स्पर्धात्मक व गुणवत्ताधारित ठेवण्यासाठी SSC मार्फत CHSL, CGL, MTS, GD Constable यांसारख्या परीक्षा आयोजित केल्या जातात. SSC मुळे देशभरातील तरुणांना केंद्र सरकारमध्ये स्थिर व सुरक्षित नोकरीची समान संधी उपलब्ध होते.हि माहिती आपल्याला देण्याचे कारण कि आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते! किंवा आपण तयारी करत असलेल्या विभागाविषयी जर माहिती असेल तर अभ्यासासाठी खूप उपयुक्त ठरतो. प्रत्येकाच नोकरी लागण्याच स्वप्न असते. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नाचा पाठलाग करावा लागतो म्हणजे स्वप्नामागे पळू नका असा याचा अर्थ नाही! पण आपण जे एखाद्या नोकरीचे स्वप्न जर पाहत आहोत तर त्या परीक्षाची डिमांड काय? अभ्यासक्रम काय आहे? हे सर्व समजून घेतल आणि योग्य अभ्यासाची दिशा ठरवली तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

SSC CHSL मार्फत भरली जाणारी पदे:

  • कनिष्ठ सहायक
  • पोस्टल असिस्टट/ सॉर्टीग असिस्टट
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर
  • न्यायालयीन लिपिक

शैक्षणिक पात्रता:

CHSL ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता:

यामध्ये प्रत्येक प्रदेशानुसार शारीरिक पात्रता वेगवेगळी आहे ती खालीलप्रमाणे आहे.

प्रदेश शारीरिक पात्रता
 उंची छातीवजन
जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब हिल्स, होशिआरपूर, ग्रह शंकर, रोपर आणि चंडीगड, उत्तराखंड 158 सेमी75 सेमी47. 5 किलो
सिक्कीम, नागालेंड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय, असम, पश्चिम बंगाल, दार्जीलिंग, कालीम्पोंग, अंदमान निकोबार152 सेमी75 सेमी47.5 किलो
पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश162.5 सेमी75 सेमी50 किलो
पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडीसा, झारखंड157 सेमी75 सेमी50 किलो 
आन्द्र प्रदेश, कर्नाटक, तमिळ नाडू, केरला, तामिळनाडू, केरळ, गोवा, पोंडूचेरी, तेलंगाना157 सेमी75 सेमी50 किलो

SSC (Stop Selection Comission) अधिकृत संकेस्थळवर जाण्यासाठी क्लिक करा !

परीक्षा पद्धती:

पहिली पायरी

पहिल्या पायरीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे जी 4 विभागामध्ये घेतली जाणार आहे. ज्याचे एकत्रित गुण 200 होतात. हे एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 02 गुणांचा असतो.

दुसरी पायरी:

दुसरी परीक्षा ही मुख्य स्वरुपात लेखी स्वरुपाची असते. यामध्ये दोन विभागानुसार पेपर घेतले जातात. ज्यामध्ये काही उपविभाग देखील आहेत. 100 गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे. या परीक्षेसाठी कोणतीही नकारात्मक गुणपद्धती नसणार आहे.

वरील दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांसाठी मेरीट लिस्ट लागते. मेरीट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर उमेदवाराची संबंधित पदी निवड केली जाते.

वयोमर्यादा:

सदर भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.

यामध्ये प्रवर्ग व पात्रतेनुसार उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट दिली आहे ती खालीलप्रमाणे आहे.

  • ST प्रवर्ग: 05 वर्षे सूट
  • OBC प्रवर्ग: 05 वर्षे सूट
  • PwD प्रवर्ग: 10 वर्षे सूट
  • PwD (OBC): 13 वर्षे सूट
  • PwD (SC/ ST): 15 वर्षे सूट
  • माजी सैनिक: 03 वर्षे सूट
  • किमान 03 वर्षे सरकारी नोकरी असलेले उमेदवार: 40 वर्षांपर्यंत
  • किमान 03 वर्षे सरकारी नोकरी केलेले SC/ ST प्रवर्गातील उमेदवार
  • विधवा महिला: 35 वर्षांपर्यंत
  • SC/ ST प्रवर्गातील विधवा महिला: 40 वर्षांपर्यंत

निवड प्रक्रिया:

SSC CHSL ची ही परीक्षा प्रामुख्याने दोन स्टेज मध्ये होते.

पहिल्या स्टेज मध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाते आणि दुसऱ्या स्टेज मध्ये परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही स्वरुपात असते. दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवार पुढील प्रक्रियेस पात्र ठरतो.

अभ्यासक्रम:

या परीक्षेसाठी इंग्रजी भाषा, सामान्य बुध्दिमत्ता, परीनामात्मक योग्यता आणि सामान्य जागरूकता या विषयांचा अभ्यास करावा लागतो.

  • इंग्रजी भाषा: शब्दसंग्रह, आकलन, व्याकरण
  • सामान्य बुध्तीमत्ता: तर्कशक्ती, विश्लेषणात्मक क्षमता
  • परीणामात्मक योग्यता: अंकगणित, गणित, आकडेवारी
  • सामान्य जागरूकता: इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी

📘 SSC CHSL Syllabus (Topic-Wise)
SSC CHSL परीक्षा Staff Selection Commission मार्फत घेतली जाते आणि सध्या Tier-I व Tier-II अशा दोन टप्प्यांत असते.
🟢 Tier-I : Objective (CBT)
1️⃣ General Intelligence & Reasoning
Analogies
Classification
Series (Number / Alphabet)
Coding – Decoding
Blood Relation
Direction Sense
Order & Ranking
Venn Diagram
Syllogism
Puzzle (Basic level)
Non-Verbal Reasoning (Figure analogy, mirror image)
2️⃣ Quantitative Aptitude (Mathematics)
Number System
Simplification
Percentage
Profit & Loss
Simple Interest
Ratio & Proportion
Average
Time & Work
Time, Speed & Distance
Mensuration (2D & Basic 3D)
Algebra (Basic identities, linear equations)
Data Interpretation (Table, Bar Graph, Pie Chart)
3️⃣ English Language
Reading Comprehension
Cloze Test
Error Spotting
Sentence Improvement
Fill in the Blanks
Synonyms & Antonyms
One Word Substitution
Idioms & Phrases
Active – Passive Voice
Direct – Indirect Speech
Spelling Correction
4️⃣ General Awareness
History (Indian + Freedom Movement – basics)
Geography (India & World – basics)
Indian Polity (Constitution, Parliament, President)
Indian Economy (Basic concepts)
General Science (Physics, Chemistry, Biology – 10th level)
Current Affairs (Last 6–8 months)
Static GK (Awards, Books, Days, Sports)
🟡 Tier-II : Descriptive + Skill Test
✍️ Section-I : Mathematical Abilities
Arithmetic concepts (Advanced level of Tier-I)
Problem solving & application based questions
✍️ Section-II : English Language & Comprehension
Advanced Grammar
Vocabulary usage
Comprehension based questions
🖥️ Section-III : Skill Test / Typing Test
Typing Test (LDC/JSA)
English: 35 WPM
Hindi: 30 WPM
Skill Test (DEO)
Data Entry speed test

वरील अभ्यासक्रम हा एक दिशा किंवा मार्गदर्शन म्हणून विविध अधिकृत स्रोताकडून घेतला आहे. आपण एकदा खात्री करण्यासाठी अधिकृत अभ्यासक्रम पाहावा!

Agniveer Syllabus 2025: Army, Navy, Airforce संपूर्ण अभ्यासक्रम PDF सहDownload Now
SSC GD 2025 Syllabus PDF | एसएससी जीडी अभ्यासक्रम मराठीत – विषयवार माहिती”Download Now
SSC MTS Syllabus 2025 in Marathi | एसएससी एमटीएस अभ्यासक्रम मराठीतDownload Now
RRB Group D Syllabus 2025 In Marathi | रेल्वे ग्रुप D अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्नDownload Now

वेतनश्रेणी:

निम्न विभाग लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पोस्टल असिस्टट

वरील पदांसाठी 25500 ते 81100 वेतनश्रेणी असणार आहे.

तसेच काही पदांसाठी 29200 ते 92300 रुपये वेतनश्रेणी असणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पैन कार्ड
  • इमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • 10 वी व 12 वी ची गुणपत्रिका
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईझ फोटो

परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काय करावे:

  • वेळेचे नियोजन करून अभ्यास करावा.
  • सर्व विषयांची शेवटी रिविजन करावी.
  • अवघड प्रश्न सोडवा.
  • जास्तीत जास्त अभ्यास करावा.

अभ्यासासाठी प्रेरणा:

SSC CHSL परीक्षा ही केवळ सरकारी नोकरी मिळवण्याचे माध्यम नसून, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व स्थिर करिअर घडवणारी संधी आहे. कमी शैक्षणिक पात्रतेत केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये काम करण्याची संधी ही या परीक्षेची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. योग्य अभ्यासक्रम समजून घेऊन, नियोजनबद्ध अभ्यास व सातत्य राखल्यास SSC CHSL मध्ये यश मिळवणे निश्चित शक्य आहे. आजच्या स्पर्धात्मक काळात फक्त मेहनतच नव्हे, तर स्मार्ट अभ्यास, वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि आत्मविश्वास यांची तितकीच गरज असते. SSC CHSL ची तयारी करताना एक स्पष्ट ध्येय ठेवल्यास आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही परीक्षा विद्यार्थ्याच्या आयुष्याला नक्कीच नवे वळण देऊ शकते.SSC CHSL ही एक महत्वाची परीक्षा आहे. या परीक्षेमार्फत तुम्ही अनेक मोठ्या पदांवरती जाऊ शकता. ही परीक्षा अवघड आहे परंतु तुम्ही जर सतत अभ्यास केला तर लवकरच तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण करू शकता.सरकारी नोकरी मिळवणे हे अनेक लोकांचे स्वप्न असते. समाजामध्ये सरकारी नोकरदाराला खूप मान आणि सन्मान मिळतो. वेतनही चांगले मिळते  त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगला अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल.

नमस्कार मित्रानो आज आपण SSC CHSL परीक्षा माहिती 2026 | पात्रता, अभ्यासक्रम, तयारी मार्गदर्शन याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. हि माहिती अपूर्ण हि असू शकते ! आपण कोणताही पदभरतीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एकदा अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत जाहिरात वाचणे गरजेचे आहे. आम्ही आपल्याला एक मार्गदर्शन म्हणून वविध स्रोताहून माहिती जमा करून, महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्याचा प्रयन्त करत असतो. आम्ही दिलेली माहिती जर आपल्याला उपयोगी येत असेल, तर इतर आपल्या मित्रांना हि माहिती शेअर करा जेणेकरून आपल्यामुळे एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत होईल. अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी आजच आम्ह्चा whatsaap व teligram ग्रुप नक्की जॉईन करा आणि रोजच नोकरीसंदर्भात माहिती मिळवा आपल्या मोबाईल वर तेही निशुल्क. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेछ्या……

SSC ची स्थापना कधी करण्यात आली?

Staff Selection Commission (SSC) ची स्थापना 1975 साली करण्यात आली.

SSC ची स्थापना का करण्यात आली?

केंद्र सरकारच्या विविध खात्यांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया पारदर्शक, एकसमान आणि गुणवत्ताधारित करण्यासाठी SSC ची स्थापना करण्यात आली.

SSC चे मुख्य काम काय आहे?

SSC चे मुख्य काम म्हणजे केंद्र सरकारच्या ग्रुप ‘B’ व ‘C’ पदांसाठी परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची निवड करणे.

SSC कोणकोणत्या परीक्षा आयोजित करते?

SSC मार्फत CHSL, CGL, MTS, GD Constable, Stenographer यांसारख्या परीक्षा घेतल्या जातात.

SSC कोणत्या विभागांसाठी भरती करते?

SSC विविध केंद्र सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांसाठी कर्मचारी निवड करते.

SSC च्या भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य काय आहे?

SSC ची भरती प्रक्रिया ऑनलाइन, स्पर्धात्मक, आणि मेरिटवर आधारित असते.

SSC मुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो?

SSC मुळे कमी शैक्षणिक पात्रतेतही केंद्र सरकारमध्ये स्थिर व सुरक्षित नोकरीची संधी विद्यार्थ्यांना मिळते.

SSC CHSL साठी कोचिंग आवश्यक आहे का?

कोचिंग उपयुक्त ठरू शकते, मात्र स्वयंअभ्यास व योग्य साहित्यानेही यश मिळू शकते.

SSC CHSL ची तयारी कधी सुरू करावी?

12 वी झाल्यानंतर किंवा शेवटच्या वर्षात असतानाच तयारी सुरू करणे फायदेशीर ठरते.

SSC CHSL साठी वयोमर्यादा किती असते?

सामान्यतः उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असते (आरक्षणानुसार सूट लागू होते).

SSC CHSL परीक्षा किती टप्प्यांत घेतली जाते?

SSC CHSL परीक्षा साधारणपणे दोन टप्प्यांत (Tier-I व Tier-II) घेतली जाते.

SSC CHSL मध्ये कोणती पदे भरली जातात?

Lower Division Clerk (LDC), Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator

SSC CHSL साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार 12 वी (Higher Secondary) परीक्षा मान्यताप्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

SSC CHSL परीक्षा कोण आयोजित करते?

SSC CHSL परीक्षा केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी Staff Selection Commission मार्फत आयोजित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment