ZP Bharti Syllabus 2026 – जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम PDF

ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी जिल्हा परिषद भरती ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमार्फत विविध पदांसाठी भरती केली जाते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आजच्या स्पर्धात्मक युगात ZP Bharti 2026 ही दहावी, बारावी तसेच पदवीधर उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी ठरते. स्थिर नोकरी, समाजसेवा करण्याची संधी आणि सुरक्षित भवितव्य यामुळे जिल्हा परिषद भरतीकडे तरुणांचा मोठा ओढा आहे.योग्य अभ्यासक्रम, परीक्षेची रचना आणि विभागाची कार्यपद्धती समजून घेतल्यास जिल्हा परिषद भरतीत यश मिळवणे नक्कीच सोपे होते.
जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली?
भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार देण्यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आणण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदांची स्थापना 1962 साली झाली. ग्रामीण भागातील विकासकामे प्रभावीपणे राबवणे, प्रशासन गावपातळीपर्यंत पोहोचवणे आणि लोकप्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
जिल्हा परिषद ही जिल्हा पातळीवरील सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्था असून तिच्या अंतर्गत पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती कार्यरत असतात.
जिल्हा परिषद विभागाची प्रमुख कामे
जिल्हा परिषद केवळ भरती करणारा विभाग नसून ग्रामीण विकासाचा कणा मानली जाते. खाली जिल्हा परिषदेची काही महत्त्वाची कामे दिली आहेत:
ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था,आरोग्य सेवा व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे व्यवस्थापन. पाणीपुरवठा व स्वच्छता योजना राबवणे. महिला व बालकल्याण योजना. ग्रामीण रस्ते व इतर मूलभूत सुविधा .कृषी व पशुसंवर्धन संबंधित सेवा. रोजगार हमी व सामाजिक विकास योजना, या सर्व कामांसाठी सक्षम मनुष्यबळाची गरज असल्याने वेळोवेळी जिल्हा परिषद भरती घेतली जाते.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागातर्फे विविध पदांसाठी जिल्हा परिषद भरती काढली जाते. जिल्हा परिषद मध्ये विविध पदांचा समावेश होतो. ही भरती सरळसेवा भरती असून या भरतीसाठी दरवर्षी अनेक पदे भरले जातात.
जिल्हा परिषद भरतीबाबत सविस्तर तपशील आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. जसे की जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणती पदे भरली जातात. जिल्हा परिषदेमध्ये कोणकोणती कामे केली जातात अशी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
जिल्हा परिषदेमार्फत भरली जाणारी पदे:
जिल्हा परिषदेमध्ये कोणती पदे असतात?
- आरोग्य सेवक
- आरोग्य पर्यवेक्षक
- औषध निर्माण अधिकारी
- कनिष्ठ अभियंता (पाटबंधारे यांत्रिकी)
- कनिष्ठ आरेखक
- कनिष्ठ लेखाधिकारी
- कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
- वरिष्ठ सहाय्यक
- पशुधन पर्यवेक्षक
- रिगमन
- लघुलेखक
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- विस्तार अधिकारी
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- विस्तार अधिकारी (लेखा, कृषी, पंचायत, शिक्षण, सांख्यिकी)
- कंत्राटी ग्रामसेवक
- जोडारी
- तारतंत्री
- पशुधन पर्यवेक्षक
- वरिष्ठ सहाय्यक
शैक्षणिक पात्रता:
जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदे भरली जातात. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता दिलेली असते.
ZP Bharti Exam Pattern 2026 + Syllabus Breakdown
जिल्हा परिषद भरती परीक्षा पॅटर्न व अभ्यासक्रम
अभ्यासक्रम:
ZP Bharti Marathi Section | Syllabus & Questions
मराठी भाषा:
- शब्दसंग्रह
- मुहावारे आणि वाक्ये
- व्याकरण
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- आकलन
- रिकाम्या जागा भरा
- कालखंड
- वाक्यांचे रूपांतरण
इंग्रजी भाषा:जिल्हा परिषद भरती Syllabus – इंग्रजी (English)
- सामान्य शब्दसंग्रह
- वाक्यरचना
- व्याकरण
- वाक्यप्रचारांचा आणि वाक्यांशांचा वापर आणि त्यांचे अर्थ
- उतार्याचे आकलन
सामान्य ज्ञान: ZP Bharti Syllabus 2026 – सामान्य ज्ञान (GK)
- आधुनिक भारताचा इतिहास
- भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल
- भारतीय अर्थव्यवस्था
- ग्रामीण प्रशासन
- जिल्हा प्रशासन
- राज्य प्रशासन- रचना संघटना, कामे
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- चालू घडामोडी
- भारताचे शेजारील देशांशी संबध
- जिल्ह्याचा भूगोल
- सामाजिक इतिहास
- हवामान
- शेती
- ग्रामीण विकासाशी संबंधित स्थानिक बाबी
तर्क आणि संख्यात्मक अभियोगता:ZP Bharti 2026 Syllabus – गणित (Maths) | अभ्यासक्रम
- सामान्य बुद्धिमत्ता आणि आकलन तर्क- आधारित प्रश्न
- आकृती मालिका
- संख्या मालिका
- कोडिंग-डिकोडिंग
- रक्तसंबंध
- दिशा व अंतर
- तर्कशुद्ध निष्कर्ष
- वेन आकृती
- घड्याळ व कॅलेंडर
- अंकगणित- आधारित प्रश्न
- संख्या पद्धती
- अपूर्णांक व दशांश
- टक्केवारी
- सरासरी
- नफा-तोटा
- साधे व्याज
- वेळ व काम
- वेळ, वेग व अंतर
- ल.सा.वि. व म.सा.वि.
- साधी समीकरणे
तांत्रिक प्रश्न:
जिल्हा परिषद भरतीमध्ये आरोग्य अभियांत्रिकी, कृषी आणि सांख्यिकी यासारख्या सर्व पदांसाठी तांत्रिक विषय घटक वेगवेगळे असतात.
Overall Weightage Summary
विषय अंदाजे टक्केवारी
मराठी 20–25%
गणित 20–25%
सामान्य ज्ञान 15–20%
चालू घडामोडी 10–15%
Reasoning 10–15%
English 5–10%
वयोमर्यादा:
जिल्हा परिषद भरतीमध्ये उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 21 वर्षे असते. काही पदांसाठी वयोमर्यादा 38 वर्षे पण असू शकतो. SC/ ST/ OBC पदांसाठी 5 वर्षे सवलत दिली जाते.
निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा:
या भरतीसाठी सर्वप्रथम संगणक आधारित लेखी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा निवड प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. 100 प्रश्नांची ही परीक्षा असून या परीक्षेसाठी 200 गुण दिले जातात. यासाठी एकूण वेळ हा 120 मिनिटांचा असतो.
मेरीट लिस्ट:
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे एक गुणवत्ता यादी तयार केली जाते. यालाच मेरीट लिस्ट असे संबोधले जाते. या लिस्ट मध्ये ज्या उमेदवारांचे नाव येते त्यांना पुढची प्रक्रिया पार पदवी लागते ती खालीलप्रमाणे आहे.
कागदपत्र पडताळणी:
मेरीट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाते. ज्यामध्ये उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, नॉन- क्रिमिलेयर, डोमिसाइल प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) इत्यादी कागदपत्रांची पडताळणी होते.
अंतिम निवड यादी:
वरील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा निवड समितीद्वारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाते. या यादीमध्ये ज्या उमेदवारांचे नाव येईल त्या उमेदवाराला जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त केले जाते.
परीक्षेचे स्वरूप:
विषयांनुसार प्रश्नांची संख्या व गुण:
| विषय | प्रश्न | गुण |
| मराठी | 15 | 30 |
| इंग्रजी | 15 | 30 |
| सामान्य ज्ञान | 15 | 30 |
| गणित व बुद्धिमापन | 15 | 30 |
| तांत्रिक प्रश्न | 40 | 80 |
| एकूण प्रश्न | 100 | 200 |
| परीक्षेचा कालावधी | 120 मिनिटे |
| Agniveer Syllabus 2025: Army, Navy, Airforce संपूर्ण अभ्यासक्रम PDF सह | Download Now |
| SSC GD 2025 Syllabus PDF | एसएससी जीडी अभ्यासक्रम मराठीत – विषयवार माहिती” | Download Now |
| SSC MTS Syllabus 2025 in Marathi | एसएससी एमटीएस अभ्यासक्रम मराठीत | Download Now |
| RRB Group D Syllabus 2025 In Marathi | रेल्वे ग्रुप D अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न | Download Now |
| SSC CHSL परीक्षा माहिती 2026 | पात्रता, अभ्यासक्रम, तयारी मार्गदर्शन | Download Now |
| ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF 2026 | Gramsevak Bharti Syllabus 2026 Pdf In Marathi | Download Now |
| Talathi Bharti Syllabus 2026 | तलाठी भरती अभ्यासक्रम PDF Marathi | Download Now |
वेतनश्रेणी:
या भरती अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी वेगवेगळी वेतनश्रेणी दिली जाते. वेतन स्तरानुसार पदांची वेतनश्रेणी ठरली जाते.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
- 10/ 12 वी/
- पदवी/ पदविकेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन- क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- खेळाडू प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- MSCIT प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
- सही
यातील काही कागदपत्रे प्रवर्ग किंवा तुमचे शिक्षण यावर अवलंबून असते.
अर्ज करताना घ्यावयाची काळजी:
- अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचावी.
- तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तप्शून घ्यावी.
- इमेल, जन्मतारीख व इतर माहिती व्यवस्थित व अचूक भरावी.
- आपल्या प्रवर्गानुसार अर्ज सबमिट करावा.
- घोषणा पत्र लिहून अपलोड करा.
- अर्ज करताना जिल्हा निवडा व शेवटी अर्ज फी भरून अर्ज सबमिट करावा.
परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काय करावे:
- अभ्यासक्रम समजून घ्या.
- कठीण प्रश्न सतत सोडवा.
- सतत रिविजन करा.
- सर्व विषयांना समान गुण असल्याने सर्व विषयांचा चांगला अभ्यास करा.
- कमी वेळात गणिते सोडवण्याचा प्रयत्न करा.
- 2 तासात 100 प्रश्न सोडवण्यासाठी टायमर लावा.
- प्रश्न सोडवल्या नंतर चुकांचे विश्लेषण करा.
- चालू घडामोडींवर लक्ष ठेवा.
- अभ्यासात सातत्य ठेवा.
अभ्यासासाठी प्रेरणा:
जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदे भरली जातात. जिल्हा परिषदेमध्ये पगार पण उत्तम मिळतो. त्यामुळे तुम्ही चांगला अभ्यास करून या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. यातील सर्वच पदे उच्च प्रतिष्ठित आहेत त्यामुळे तुम्हाला ही पदे मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषद दरवर्षी अनेक पदांसाठी भरती काढते. त्यामुळे तुम्ही जर सातत्याने यातील कोणत्याही एका पदाचा अभ्यासक्रम घेऊन अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितच पद मिळवणे जास्त कठीण होणार नाही.
जिल्हा परिषद भरती म्हणजे काय?
जिल्हा परिषद भरती ही ग्रामीण भागातील प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी जिल्हा परिषद विभागामार्फत विविध पदांसाठी केली जाणारी शासकीय भरती प्रक्रिया आहे. या भरतीद्वारे ग्रामपातळीवरील सेवा अधिक सक्षम केल्या जातात.
जिल्हा परिषद भरती 2026 कधी निघणार?
जिल्हा परिषद भरतीची जाहिरात राज्य शासनाच्या निर्णयानुसार वेगवेगळ्या टप्प्यांत प्रसिद्ध केली जाते. अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच भरती प्रक्रिया सुरू होते.
ZP Bharti साठी पात्रता काय असते?
जिल्हा परिषद भरतीसाठी पदानुसार पात्रता वेगवेगळी असते. काही पदांसाठी 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते, तर काही पदांसाठी पदवीधर पात्रता मागितली जाते.
जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा किती असते?
सामान्यतः जिल्हा परिषद भरतीसाठी किमान वय 18 वर्षे असते. कमाल वयोमर्यादा शासन नियमांनुसार ठरवली जाते आणि आरक्षित प्रवर्गांना सवलत दिली जाते.
जिल्हा परिषद भरती परीक्षा पद्धत कशी असते?
ZP Bharti परीक्षेमध्ये बहुतेक वेळा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे (MCQ) प्रश्न विचारले जातात. विषयांमध्ये मराठी, गणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी व बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश असतो.
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम कसा असतो?
जिल्हा परिषद भरतीचा अभ्यासक्रम साधारणपणे शालेय स्तरावर आधारित असतो. मराठी व गणित हे स्कोअरिंग विषय मानले जातात, तर सामान्य ज्ञानामध्ये जिल्हा परिषद संबंधित प्रश्नांना महत्त्व असते.
ZP Bharti साठी English विषय असतो का?
काही पदांसाठी जिल्हा परिषद भरती परीक्षेत इंग्रजी विषयाचा समावेश असू शकतो. मात्र इंग्रजी विषयाचा स्तर साधारणपणे बेसिक असतो.
जिल्हा परिषद भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का?
निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही हे संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत स्पष्ट केलेले असते. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असते.
जिल्हा परिषद भरतीसाठी तयारी कधी सुरू करावी?
जिल्हा परिषद भरतीसाठी तयारी शक्यतो जाहिरात येण्याआधीच सुरू करावी. अभ्यासक्रम आधी समजून घेऊन नियोजनबद्ध अभ्यास केल्यास यशाची शक्यता वाढते.
जिल्हा परिषद भरतीसाठी कोणते विषय सर्वाधिक महत्त्वाचे आहेत?
मराठी आणि गणित हे विषय जिल्हा परिषद भरतीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून देणारे मानले जातात. त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांना महत्त्व दिले जाते.
जिल्हा परिषद भरतीसाठी PDF नोट्स उपयुक्त ठरतात का?
होय, विषयानुसार तयार केलेल्या PDF नोट्स आणि सराव प्रश्नपत्रिका जिल्हा परिषद भरतीसाठी खूप उपयुक्त ठरतात, विशेषतः पुनरावृत्तीसाठी.


